नाव घे… नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो मराठी उखाणे (marathi ukhane) पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे.
तुमच्या सोयीनुसार यातील एक तरी उखाणा नक्की लक्षात ठेवा.
मराठी उखाणे नवरी साठी
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले.
पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
इंग्रजीत म्हणतात मून,
…. चंं नाव घेते …. ची सून.
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
…..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून
काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती
झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची
सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद
शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता
मराठी उखाणे नवरदेवासाठी
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
…. नी दिली मला दोन गोड मुले.
झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!
दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
Ukhane Marathi
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची साराथी
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
…. मुळे झाले संसाराचे नंदन.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
⇒ हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.
डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे |
⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;
——— रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
⇒ माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी हौशी;
———- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.
⇒ हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
———- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस
⇒ मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
———- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल.
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
…. चे नाव घेतो ऐका देऊन कान.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी …. म्हणते मधुर गाणी.
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा.
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
वादळ आलं,
पाऊस आला,
मग आला पूर… हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.
केसर दुथात टाकलं काजू,
बदाम, जायफळ,
हिचं नाव घेतो,
वेळ न घालवता वायफळ.
⇒ मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
———- रावां चे नाव घेते, केला थाटमाट
⇒ आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
———- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.
⇒ तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
———- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
⇒ घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
———- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे
⇒ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
——– रावांचे नाव घेते भरली माझी ओटी.
⇒ वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज.
⇒ कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
——– रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.
⇒ फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
——– रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.